भारतीय स्त्री जीवन - काल, आज, उद्या
₹80.00
In stock
SKU
BDC00121
विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा श्रीमती निवेदिता भिडे यांनी स्वामी विवेकानंदांच्या दृष्टीकोनातून भारतीय स्त्रीजीवन या विषयावर लिहिलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा भातीय स्त्री-जीवन काल, आज, उद्या हा अशोक गंगाधर कुलकर्णी यांनी केलेला मराठी अनुवाद. तो प्रकाशित होत असताना ते हयात नाहीत याची बोच मात्र कायमच मनात राहणार आहे.
पुस्तक प्रकाशित होत असताना लेखक हयात नसल्याची विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाच्या वाटचालीतील ही दुसरी घटना. लेखक-अनुवादक-संपादक यांची टीम एकीकडे चांगल्या प्रकारे उभी रहात असताना दुसरीकडे प्रथम शशिकांत मांडके यांचे जाणे व आता अशोक गंगाधर कुलकर्णी यांचे हयात नसणे मनाला वेदना देणारे आहे.
एकूणच भारतीय स्त्री जीवनावर, किंबहुना भारतीय स्त्रीच्या वेदकालापासूनच्या बुद्धीमत्तेवर, तिच्यातील शौर्यगुणांवर, तिच्या पातिव्रत्यावर, तिच्या आदर्श मातृत्वगुणांवर, तिच्या युद्धकौशल्यावर, तिच्या संघटनकौशल्यावर जसे अनेकांनी लिहिले, बोलले आहे, तसेच समाजव्यवस्थेत शिरलेल्या काही कुप्रथांमुळे नाडल्या-दडपल्या-उपेक्षिल्या-अव्हेरल्या-हिणवल्या गेलेल्या स्त्री-जीवनावरही अनेकांनी लिहिले आहे, त्याविरूद्ध आवाज उठवला आहे, चळवळी उभ्या करून लढे दिले आहेत आणि स्त्री-शिक्षणासारखे महत्वाचे विधायक पाऊलही उचलले आहे. स्त्रीजीवन समृद्ध करणारे प्रबोधनात्मक पर्याय स्त्रीसंतांनीही अंगीकारले आहेत.
भारतीय समाजव्यवस्थेत महिला दोन टोकांना विभागल्या गेलेल्या दिसतात. याला कारण शिक्षण हे तर आहेच, परंतु शहरी आणि ग्रामीण-अादिवासी जीवनातील टोकाची दरी हेही आहे. परंपरावादी आणि परंपराविरोधी ही ती दोन टोके आहेत. पण पूर्वकालीन समाजजीवनाचा वेध घेण्याबरोबरच वर्तमानातील आव्हाने, महत्वाकांक्षा यांचा अभ्यास करत जागतिक परिप्रेक्ष्यातील दृष्टीकोनांचा समन्वय साधत भारतीय विचार-संस्कृती-जीवनाधार यांचा मेळ साधत भविष्यकालीन मार्गांची मांडणी करणे गरजेचे होते, तो एक प्रयत्न हे लेखन करते आहे असे मराठी प्रकाशन विभागाला वाटते आहे..
स्वामी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, माता शारदादेवी आणि भगिनी निवेदिता यांनी या विषयाची केलेली मांडणी, त्याला दिलेला चिर पुरातनतेचा त्याचबरोबर नित्य नूतनाचा आणि अत्याधुनिक संदर्भांसह समाजघडणीचा पैलू मोहवून टाकणारा, एक नवी विचारदृष्टी देणारा आहे. स्त्री मुक्तीची नव्हे, स्त्री शक्तीची भाषा करणारी त्यांची मांडणी, त्या अनुषंगानेच 1936 साली सुरू झालेली राष्ट्र सेविका समिती, 1953 मध्ये स्थापन झालेला श्रीसारदा मठ आणि मिशन, 1972 मध्ये विवेकानंद केंद्राने जीवनव्रती या नात्याने राष्ट्रनिर्माणाच्या कार्यार्थ उभी केलेली फळी आणि 1988 च्या सुमारास स्थापन झालेली भारतीय स्त्री शक्ती यांचे या प्रबोधनपर्वातील स्थान खूप मोठे आहे.
निवेदितादीदींनी या प्रबोधनपर्वाची केलेली ही मांडणी खचितच नवी दिशा, नवा दृष्टीकोन देणारी ठरावी. पुन्हा एकदा संबंधित सर्वांचे मन:पूर्वक आभार.
VRM Code | 3212 |
---|---|
Edition | 1 |
Pages | 120 |
Volumes | 1 |
Format | Soft Cover |
Author | Nivedita Raghunath Bhide |
Write Your Own Review